Latest News

 

Press Release

“सदरक्षणाय खलनिग्रहणाय”

Events

अखेर परिश्रमाला यश : द्वारका डोखे ठरल्या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला पोलीसआई-वडिलांचे नाव सर्वोच्च शिखरावर पोहोचविण्याचे ध्येय.

आई-वडिलांना आयुष्याचे हिरो मानणाऱ्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या द्वारका विश्वनाथ डोखे (वय 49) यांनी अखेर आठ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर (8,848.86मीटर ) सर करण्याची मोहीम फत्ते केली. आपल्या...
DGP`s Message

आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक, झोपडपट्टीवासी,गरीब आणि समाजातील इतर उपेक्षितघटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.

श्रीमती रश्मि शुक्‍ला

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

Director`s Message

              महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ही महाराष्ट्र पोलीस दलाची शिखर पोलीस प्रशिक्षण संस्था सन 1906 पासून कार्यरत आहे.  या संस्थेत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांना पोलीस कामकाजाचे मुलभूत प्रशिक्षण अनुभवी पोलीस अधिकारी व विधी निदेशक यांच्याकरवी दिले जाते.  मुलभूत प्रशिक्षणामध्ये आंतरवर्ग प्रशिक्षणा बरोबरच बाह्यवर्ग प्रशिक्षण देखील दिले जाते.  या दोन्ही प्रकारच्या प्रशिक्षणाकरीता महाराष्ट्र पोलीस अकादमीकडे अत्याधुनिक व दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.  या संस्थेकडून भारतीय पोलीस सेवेतील नव्याने रुजु झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना स्थानिक कायदे व इतर अनुषंगिक विषयाचे प्रशिक्षण दिले जाते.  गोवा राज्यातील पोलीस अधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाचे वन खाते, राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग इत्यादी विभागांच्या अधिका·यांना देखील या संस्थेत मुलभूत प्रशिक्षण दिले जाते.

        महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये अत्युच्च दर्जांचे प्रशिक्षण दिले जाते.  त्यामुळे महाराष्ट्र पोलीसांच्या लौकिकात भर घालणारे अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलास या प्रशिक्षण संस्थेतून मिळाले आहेत.  प्रशिक्षणाची ही उच्च कोटीची परंपरा अशीच पुढे चालू राहील याची मी महाराष्ट्र पोलीस अकादमीचा संचालक म्हणून ग्वाही देतो.

 जय हिंद  !

(राजेश कुमार)

संचालक,

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक

MSPG 2024 Nashik

Virtual Tour Video